‘इंदिरा आणि राजीव गांधींचं टपाल तिकिटं बंद करणे हे क्षुद्र राजकारण’

September 16, 2015 8:28 PM0 commentsViews:

bjp vs cong416 सप्टेंबर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची टपाल तिकिटं बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं आज जोरदार टीका केली. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे क्षुद्र राजकारण आहे, यातून सरकारची मनोवृत्ती दिसून येते असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केलाय.

टपाल तिकिटं बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आज दिल्लीमध्ये जोरदार निदर्शनंही केली. मात्र, भाजपनं काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांची तिकिटं काढण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय आणि हे काँग्रेसचे नेतेच होते असं रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close