रॉबर्ट वडरांना यापुढे विमानतळावर सुरक्षा तपासणीत सवलत नाही

September 16, 2015 8:43 PM0 commentsViews:

robat vadara16 सप्टेंबर : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा यांना आता विमानतळावर सुरक्षा तपासणीतून सवलत मिळणार नाही. यापूर्वी विमानतळावर विशेष सवलत मिळणार्‍या व्यक्तींच्या यादीमध्ये वडरा यांचं नाव होतं. मात्र, आता ते वगळण्यात आलं आहे.

केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतरही वडरा यांना मिळणारी सवलत कायम होती. रॉबर्ट वडरा यांना विमानतळावर देण्यात येणारी सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचे संकेत नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी मागील वर्षीच दिले होते. त्यावरुन बराच गदारोळ झाला होता.

सुरक्षेला काही अर्थ असला पाहिजे, ती मिरवण्यासाठी नको. जर कुणाच्या जिवीताला धोका असेल तर ठीक आहे. पण, सर्वसाधारणपणे सर्वांना सारखा न्याय हवा असं स्पष्टीकरण गजपती राजू यांनी दिलं होतं.

अखेर आता मात्र हवाई वाहतूक मंत्रालयानं यासंबंधीचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे वडरांना यापुढे विमातळावर सुरक्षा तपासणी करूनच पुढे जावं लागणार आहे. काँग्रेसनंही या निर्णयाचं स्वागत केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close