पॉलसन जोसेफची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

January 6, 2010 1:07 PM0 commentsViews: 1

6 जानेवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पॉलसन जोसेफ आणि पॉलसनची पत्नी मेरी पॉलसन यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. पॉलसन हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईशान्य मुंबई विभागाचा पदाधिकारी होता. तर त्याची पत्नी मेरी ही राष्ट्रवादीच्या मध्य मुंबईची महिला जिल्हा अध्यक्ष होती. चेंबूरमध्ये ख्रिसमसच्या दिवशी एका क्लबमध्ये पॉलसन यांनी एक पार्टी दिली होती. या पार्टीत गँगस्टर्ससोबतच अनेक पोलीस अधिकारी नाचले होते. त्या सर्व पोलीस अधिकार्‍यांना याआधीच बडतर्फ करण्यात आलं आहे.

close