श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

January 7, 2010 10:59 AM0 commentsViews: 4

7 जानेवारीश्रीनगरच्या लाल चौक भागात लष्कर आणि दहशतवादी 22 तासांपासून सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीत दोनही दहशतवादी ठार झालेत. तारीक आणि उस्मान असं ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. दोघेही पाकिस्तानचे नागरिक आहेत. तर या चकमकीत 2 जवान शहीद झाले. यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. जमाल-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

close