साखर महागली : 45 रुपये किलो

January 7, 2010 11:53 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी अन्नधान्यानंतर आता साखरही महागली आहे. नवी मुंबईच्या होलसेल मार्केटमध्ये साखरेचा भाव 41 रूपये किलो झाला आहे. त्यामुळे सामान्यांना ही साखर 45 रुपयांहून अधिक किंमतीला मिळेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी साखरेचा भाव वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला होता. एकीकडे महागाईने सामान्य जनता त्रस्त झाली असतानाच साखरेच्या भाववाढीला तोंड द्यावं लागणार आहे.

close