डॉ. आंबेडकर विद्यापीठातल्या गुणवाढ प्रकरणी दोषींना सक्तीची दीर्घ रजा

January 7, 2010 1:28 PM0 commentsViews: 3

7 जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या गुणवाढ प्रकरणात अडकलेल्या उप-कुलसचिव ईश्‍वर मंझा आणि इतर तिघांना विद्यापीठाने सक्तीच्या दीर्घ रजेवर पाठवलं आहे. विद्यापीठात उप-कुलसचिव पदावर असलेल्या ईश्‍वर मंझा यांनी M.SC च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये गुणवाढ दिली होती. याप्रकरणी डॉ. डी. आर. माने यांच्या समितीने चौकशी केली होती. चौकशीत ईश्‍वर मंझा, त्यांचे भाऊ रमेश मंझा, सतीश पाटील आणि कर्मचारी गायके या चौघांना दोषी ठरवण्यात आलं होतं. पण याप्रकरणी आणखी कोणा कोणाचा समावेश आहे तसंच असे सारखे प्रकार याआधीही कधी घडले होते का असे अनेक प्रश्न यासंबंधात उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अखेर या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. तसंच त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात FIR दाखल केली जाणार आहे. त्यामुळेच तपास होईपर्यंत गुणवाढ प्रकरणातल्या 4 दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

close