आशिष जाधव यांना ‘रमेश रायकर बोस स्मृती पुरस्कार’ प्रदान

January 7, 2010 1:30 PM0 commentsViews: 4

7 जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांचा गौरव मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी करण्यात आला. आयबीएन-लोकमतचे सीनिअर करस्पॉंडंट आशिष जाधव यांचाही सन्मान करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या रमेश रायकर बोस स्मृती पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस यांच्या हस्ते आशिष जाधव यांना वर्षभरातल्या शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. तर आबीएन-लोकमतचे डेप्युटी न्यूज एडिटर रणधीर कांबळे यांनाही पुण्यात पुरस्कार देण्यात आला.

close