समीर गायकवाड चौकशीत तोंड उघडेना !

September 17, 2015 10:24 PM0 commentsViews:

pansare_case_sameer_gaikwad17 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाड तपासादरम्यान, पोलिसांना सहकार्य करत नाही, अशी माहिती आता पुढे आलीये. पोलिसांनी याबद्दल दुजोरा दिलाय. म्हणूनच पोलिसांनी समीरच्या आवाजाचे नमुने पडताळणीसाठी थेट गुजरातच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे. तसंच समीर तोंडउघडत नसल्यामुळे पोलिसांनी त्याचा कुटुंबियांभोवती चौकशीचा फैरा बसवलाय.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी सांगलीतून समीर गायकवाडच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी सुरू आहे. आज दुसर्‍या दिवशीही त्याची चौकशी सुरू आहे. पण त्याने सहकार्य करण्यास नकार दिलाय. कोल्हापूर पोलिसांनी समीर गायकवाडच्या दोन मामेभावांनाही ताब्यात घेतलंय. पोलीस त्यांच्याकडेही कसून चौकशी करत आहेत. सुशील जाधव आणि श्रीधर जाधव अशी त्यांची नावं आहेत. तिकडे कर्नाटकचे पोलीसही सांगलीत समीरच्या चौकशीसाठी दाखल झाले आहे. पुणे क्राईम ब्रँचचं पथकही समीरच्या चौकशीसाठी कोल्हापुरात दाखल झालंय. ही दोन्ही पथकं कलबुर्गी आणि दाभोलकरांच्या हत्येसंबंधीचे काही धागेदोरे समीर गायकवाडकडून मिळत आहेत का याची तपासणी करत आहेत.

समीर गायकवाडचे हे आहे दोन मामेभाऊ

समीरचे मामेभाऊ ताब्यात
श्रीधर विजय जाधव
वय : 23 वर्षे
शिक्षण : 12 वी
रहिवासी : संकेश्वर, कर्नाटक
व्यवसाय : सायकल दुरुस्तीचं दुकान

समीरचे मामेभाऊ ताब्यात

सुशील विजय जाधव
वय : 21 वर्षे
शिक्षण : 10 वी
रहिवासी : संकेश्वर, कर्नाटक
व्यवसाय : मेकॅनिक

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close