कुख्यात ऑईल माफिया मोहम्मद अलीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

January 7, 2010 1:33 PM0 commentsViews: 2

7 जानेवारी पुण्यातील लँड माफिया दीपक मानकर यांच्यापाठोपाठ आता कुख्यात ऑईल माफिया मोहम्मद अली यांनी सुद्धा काँग्रेसची कास धरली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देण्याचा चंगच महाराष्ट्र काँग्रेसनं बांधला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून काँग्रेसच्या विरोधात महम्मद अलींनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी बसपाचे उमेदवार असलेल्या महम्मद अलींचा कुख्यात डॉन दाऊदशी संबंध असल्याचा प्रचार काँग्रेसने केला होता. पण त्याच महम्मद अलींनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या शनिवारी मुंबईतल्या एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमाला महम्मद अलींनी हजेरी सुद्धा लावली होती. अली काँग्रेससोबत असल्याचं मुंबई काँग्रेसनंही मान्य केलं आहे.

close