पुण्यात 57 वा सवई गंधर्व संगीत महोत्सव सुरु

January 7, 2010 1:36 PM0 commentsViews: 5

7 जानेवारी पुण्यात 57 व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं गुरुवारी उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात सनईवादक प्रमोद गायकवाड यांच्या सनईचे मंगलमय सूर रसिकांच्या कानी पडले. तर संध्याकाळच्या सत्रात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचं गायन होणार आहे. त्यानंतर तरुण भट्टाचार्य यांचं संतूरवादन होईल. पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या गायनानं होणार आहे.

close