‘स्वाभिमान’चा झेंडाला आक्षेप : रिलीज लांबणीवर

January 7, 2010 1:38 PM0 commentsViews: 5

7 जानेवारी झेंडा सिनेमाला नितेश राणे यांच्या 'स्वाभिमान' संघटनेने आक्षेप घेतला आहे. ठाकरे घराण्यातील द्वंदावर आधारलेल्या या सिनेमात नारायण राणे यांच्याशी मिळतं-जुळतं कॅरेक्टर असल्याने नितेश राणे यांनी हा आक्षेप घेतला आहे. या सिनेमातील 4 सीन्सवर 'स्वाभिमान'चा आक्षेप आहे. याआधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मनसेचा विरोध मावळला. गुरुवारी 'स्वाभिमान' संघटनेसाठी 'झेंडा'च्या खास शोचं आयोजन अंधेरीत करण्यात आलं होत. त्यानंतर सिनेमाला आक्षेप असल्याचं स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी सांगितलं. स्वाभिमान संघटनेच्या आक्षेपानंतर आता झेंडाचं रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे.

close