आदेश बांदेकर यांचं होम मिनिस्टरमध्ये पुनरागमन

January 8, 2010 9:27 AM0 commentsViews: 2

8 जानेवारी महाराष्ट्रातल्या वहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर पुन्हा एकदा होम मिनिस्टर या कार्यक्रमातून पुनरागमन करणार आहेत. येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर आदेश पुन्हा एकदा होम मिनिस्टर मधल्या सुत्रसंचालकाची धुरा सांभाळतील. सध्या या भावोजीपदाची धुरा जितेंद्र जोशी सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्या नंतर त्यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. त्यात त्यंाचा पराभव झाला होता.

close