बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियांना हृदयविकाराचा झटका

September 18, 2015 8:28 AM0 commentsViews:

dalmiya_650_030315012127

18 सप्टेंबर : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया (75) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यामुळे त्यांना काल रात्री तातडीने बी. एम. बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.

हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छातीत दुखत असल्यामुळे गुरुवारी रात्री नाऊ वाजता दालमियांना बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच दालामियांना त्रास होत असल्याचं लाक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केलं. वैद्यकीय पथक त्यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

दालमियांची प्रकृती नाजूक असल्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून बीसीसीआयचा कारभार बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर हाताळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये एखाद दुसर्‍या बैठकीला लावलेल्या हजेरीचा अपवाद वगळता दालमिया यांनी बीसीसीआयच्या कामकाजात फारसा सहभाग घेतलेला नाही. सतत आजारी असलेल्या दालमियांना पदमुक्त करुन व्यक्तिची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी या घटनांमुळे जोर धरु लागली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close