विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी शिक्षणमंत्र्यांनी बोलावली बैठक

January 8, 2010 9:40 AM0 commentsViews: 2

8 जानेवारी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं गेल्या आठवड्याभरातील चिंताजनक प्रकार पाहता शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात एक बैठक बोलावली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या धक्कादायक आहेत. त्यातही परीक्षेतलं अपयश आणि वाढता ताण हीच मुख्य कारणं समोर आली आहेत. आठवड्याभरात राज्यात तब्बल 7 आत्महत्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालकवर्ग या प्रकाराने धास्तावला आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्री बैठक घेत आहेत.

close