जुन्या मुंबई-पुणे हायवेवर पावसाचा हाहाकार

September 18, 2015 5:36 PM0 commentsViews:

mumbai pune high way18 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाणी साचलं असून पूरपरिस्थिती निर्माण झालीये. राज्यात मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चक्क एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. डोंगरदर्‍यातील सगळं पाणी एक्स्प्रेस वेवर आल्याने रस्त्याच्या एका बाजूने पाणी वाहत असल्याचं चित्र आहे. लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी कामशेत बोगदा ते उर्से टोलनाक्यादरम्यान रस्त्यावर पाणी आलं आहे. याशिवाय वडगाव मावळ येथील कुडेवाडा येथे हायवेवर तर तळेगाव-लोणावळा दरम्यान, पावसामुळे पाणी साचल्याने वाहनं हळू चालवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. शक्यतो या मार्गाने प्रवास टाळा असं आवाहन आयबीएन लोकमतने केलं.

 पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली आहे. कामशेत-वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. पाण्यामुळे ट्रॅकखालची खडी वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प झालीये. पुणे-मुंबई मार्गावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्या अडकल्या आहे. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेससह अनेक गाड्या गेल्या काही तासांपासून अडकल्या आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close