राज ठाकरेंवरील राज्याबाहेरील सर्व खटले आता दिल्लीत

January 8, 2010 9:44 AM0 commentsViews: 1

8 जानेवारी राज ठाकरे यांच्यावरील राज्याबाहेरचे सर्व खटले आता दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात चालणार आहेत. महाराष्ट्राबाहेर राज यांच्यावर 7 खटले होते. त्यातले 5 खटले झारखंड आणि 2 खटले बिहारमध्ये आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षाथीर्ंनी मारल्यामुळे त्यांच्यावर हे सर्व खटेले विविध ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र हे खटले एकाच प्रकारचे असल्याने दिल्लीत वर्ग करण्याची विनंती राज ठाकरे यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात केली होती.

close