औरंगाबादमध्ये धो-धो पाऊस, ‘जायकवाडी’त पाण्याची पातळी वाढली

September 18, 2015 6:55 PM0 commentsViews:

aurangabad_rain18 सप्टेंबर : दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या मराठवाड्याला परतीच्या पावसाने गारेगार दिलासा दिलाय. मराठवाड्यात परभणी, औरंगाबाद,जालना, बीडसह सर्वच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलीये. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये गेल्या चोवीस तासात तुफान पाऊस कोसळतोय. गेल्या चोवीस तासांत जवळपास 75 मिमी पाऊस झालाय. मराठवाड्याला पाणी पुरवठा करणार्‍्ा जायकवाड़ी धरणात पाण्याची पातळी 0.16 फुटाने वाढली आहे. धरणात 3283 क्युसेस ने पाण्याची आवक झालीये. धरण क्षेत्रात 24 तासांपासून पाऊस जाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झालीय.

 फुलंब्रीत सर्वाधिक 127 मिमी पावसाची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक 127 मिमी पावसाची नोंद झालीये. त्यामुळं तालूक्यातील वडोदबाजार जवळील बोरगाव जवळ गिरीजा नदी दुथडी भरून वाहते आहे. बोरगावातील गणपती मंदिराला पाण्यानं वेढा टाकलाय. हे मंदिर नदीच्या पात्रात असलेल्यानं मंदिराला पाण्यानं लगेच वेढलं. मंदिरात अडकलेल्या 6 सहा गावकर्‍यांना पोलिसांनी सुखरूप सुटका केलीये. बोरगावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलावरील वाहतूक थांबवण्यात आलीये. पावसाचा जोर कायम राहिल्यास बोरगावात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

 नद्या तुडुंब..

औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोरड्या असलेल्या नद्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे धरणांमधला पाणीसाठाही वाढलाय. इथल्या शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय. इथल्या नागरिकांनी कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदा इतका मुसळधार पाऊस पाहिलाय.

परभणी चिंब चिंब..

भीषण दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. परभणीत काल दिवसभर पावसाळ्यातील पहिलाच मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पहिल्यांदा नदी नाले ओसंडून वाहू लागले. तसंच अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या येलदरी धरण क्षेत्रात एकाच रात्री 98 मिमी पाऊस झालाय. त्यामुळे 2 टक्के एवढा पाणी साठा वाढलाय. येत्या काही तासांत ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पीक जरी शेतकर्‍यांच्या हातून गेलं असलं तरी सर्वसामान्य माणसाच्या,जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नआणि चार्‍याचा प्रश्न या दमदार पावसामुळे मार्गी लागणार आहे.

मराठवाड्यातल्या पावसाची आकडेवारी

औरंगाबाद – 72.95 मिलीमीटर
जालना – 74.56 मिलीमीटर
परभणी – 40.96 मिलीमीटर
नांदेड – 37.71 मिलीमीटर
बीड – 16.96 मिलीमीटर
लातूर – 9.73 मिलीमीटर
उस्मानाबाद – 1.61 मिलीमीटर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close