समीर गायकवाड आमचाच कार्यकर्ता, सनातनने केलं मान्य

September 18, 2015 7:27 PM0 commentsViews:

sanatan4418 सप्टेंबर : गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला समीर गायकवाड हा आमचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली. समीर गायकवाडची पाठराखण करत गुन्हा सिद्ध झाला नाहीतर संस्थेवर कोणत्या आधारे बंदीची मागणी घालता असं सवाल उपस्थित केला.

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर गायकवाड अटकेबाबत खुलासा केला. गायकवाडला तांत्रिक कारणासाठी अटक झाली आणि जे लोक सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करतायत ते केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करतायत असा आरोप अभय वर्तक यांनी केलाय. तसंच, हे सनातनला बदनाम करण्यासाठी सुरू आहे असाही आरोप त्यांनी केलाय. ज्या आरोपीचा गुन्हा अजून सिद्धही झाला नाही, त्याच्या जोरावर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी कशी केली जाते असा सवाल वर्तक यांनी केलाय.

नरेंद्र दाभोलकर खूनानंतर नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक केली. त्याचं काय झालं. त्याचा तपास का झाला नाही असा सवाल उपस्थित करच तपास यंत्रणांनी दबावाला बळी पडून काम करत आहेत असा आरोप वर्तक यांनी केला. तसंच तपास यंत्रणांना आम्ही दाभोलकर यांच्या हत्येनंतर महत्वाची माहिती दिली. तेव्हा त्या माहितीकडे यंत्रणांनी दुर्लक्ष केलं असा खुलासाही त्यांनी केला. हे म्हणतात विचारांची लढाई आहे असं म्हणता. जेव्हा एखादा कार्यकर्ता अटक झाला तर तुम्ही अख्खी संस्था बंद करा म्हणता. पण जेव्हा ज्या पत्रकारांवर हल्ला केला. महिला पोलिसांवर हात टाकला त्यावेळेस जितेंद्र आव्हाड, शाम मानव, सचिन सांवत यांनी ब्र देखिल काढला नाही अशी टीकाही वर्तक यांनी केली.

आमच्या एका साधकाला नाहक बदनाम केलं जातंय. सनातनच्या निरपराध साधकाला पकडण्यात आलंय. त्याला बळी देण्याचा हा प्रयत्न आहे. समीर गायकवाड हा धर्म विषयक पुस्तक विकायचं काम करतो. त्यासाठी तो अनेक ठिकाणी फिरत असतो. त्यामुळे त्याने अनेक ठिकाणाहून फोन केलेत. त्याचं मोबाईल रिपेरिंगच दुकान आहे. त्यामुळे त्याने अनेक मोबाईल वरुन फोन केलेत असा दावा संजीव पुनाळेकर यांनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close