शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

September 18, 2015 7:35 PM0 commentsViews:

Sheena Boramurder mystry18 सप्टेंबर : शीना बोरा खून प्रकरणाला आज एक वेगळं वळण लागलं. महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे. राज्याचे अतिरिक्त गृह सचिव के. पी. बक्षी यांनी ही माहिती दिली.

गृहसचिव के.पी, बक्षी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शीना बोरा खून प्रकरणी माहिती दिली. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी आपला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, तपास फक्त खूनापुरता मर्यादित नाहीय. आर्थिक व्यवहारांचाही मुद्दा यात आहे. दुसरं म्हणजे सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची पीटरशी ओळख असल्याच्या बातम्या येतायत. हे सगळं लक्षात घेता तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय असं बक्षी यांनी स्पष्ट केलं. सरकारनं शीना बोरा केसला हायप्रोफाईल केलं नाही तर मीडियानेच केलं असंही ते म्हणाले. तसंच मी माझ्या 32 वर्षांच्या कारकीर्दीत पोलीस आयुक्तांना कधीही पोलीस आयुक्तांना अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करताना पाहिलं नाही असं स्पष्ट करत राकेश मारियांच्या शीना बोरा प्रकरणाच्या चौकशीवर नाराजी व्यक्त केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close