समीर गायकवाडच्या संपर्कातील सनातनची महिला साधक ताब्यात ?

September 18, 2015 11:10 PM0 commentsViews:

pansare_case_sameer_gaikwad 
18 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे खूनप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या समीर गायकवाडच्या चौकशीत आढळलेल्या त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींवर आता पोलिसांनी आपला तपास वळवलाय. याचाच भाग म्हणून सनातनची साधक असलेल्या ज्योती कांबळे नावाच्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली.

ज्योती ही मूळची सातार्‍याची असल्याचही समजतंय. मात्र, पोलिसांकडून याबाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येतेय. तसंच सनातन संस्थेकडून समीर गायकवाडला पूर्ण कायदेशीर मदत देण्यात येणार असून सांगलीतील एका महिला वकिलाने समीरच वकीलपत्र घ्यायची तयारी दाखवलीय. दरम्यान, पोलिसांनी आपला तपास वेगात सुरू केला असून समीरची पोलीस कोठडी 23 तारखेला संपत असल्याने त्यापूर्वीच पोलिसांना समीर विरोधात महत्वाचे पुरावे गोळा करावे लागणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close