कुटुंबामागे मिळणार आता एकच गॅस कनेक्शन

January 8, 2010 12:23 PM0 commentsViews: 9

8 जानेवारी केंद्र सरकारच्या नव्या गॅस कंट्रोल ऑर्डरनुसार एका कुटुंबात एकच गॅस कनेक्शन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. असा कायदा लवकरच अंमलात येणार आहे. एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असणार्‍यांना आपल्याकडील एकाहून अधिक असलेलं कनेक्शन परत करावं लागणार आहे. घरगुती गॅस पुरविणार्‍या कंपन्यांनी त्यांच्याकडील ग्राहकांची यादी एकमेकांना पुरविली आहे. त्यातून दोन कनेक्शन असणार्‍यांकडील जादा कनेक्शन परत न केल्यास अशा ग्राहकांचा गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एका कुटुंबाच्या गरजेनुसार गॅस कनेक्शन पुरविण्याच्या केंद्राच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

close