मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीत

September 19, 2015 1:35 PM0 commentsViews:

mumbai pune rail 419 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे मुंबई -पुण्याची रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. शुक्रवारी कामशेत आणि वडगावच्या दरम्यान रुळाखालची खडीच वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प होती. अजूनही ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

मुंबईहून निघालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही 8 ते 9 तास उशिरानं धावत आहे. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता मुंबईहून निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस आज सकाळी 9 वाजता जेमतेम लोणावळ्यापर्यंत पोहोचली होती.

लोणावळा आणि पुण्यादरम्यानच्या लोकल गाड्याही उशिरानं धावतायत. शुक्रवारी रात्री रेल्वेनं दुरुस्तीचं तात्पुरतं काम केलं पण जोरदार पाऊस आणि अंधारामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही. युद्धपातळीवर दुरस्तीचं काम सुरू आहे.

 या गाड्या उशिरानं

मुंबई-सीएसटी-लातूर एक्स्प्रेस 10 तास 20 मि. उशिरानं
मुंबई-हैदराबाद हुसैनसागर एक्स्प्रेस 10 तास 30 मि. उशिरानं
मुंबई सीएसटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस 8 तास 30 मि. उशिरानं
मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस 12 तास उशिरानं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close