पुन्हा शिंदेवाडी !, प्रशासनाने काही धडा घेतला का ?

September 19, 2015 1:48 PM0 commentsViews:

shindewadi19 सप्टेंबर : पुणे सातारा रस्त्यावर कात्रज बोगद्यानजीक ज्या शिंदेवाडी परिसरात 2 वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यामुळे चिमुरडी संस्कृती वाहून गेली होती. त्याच ठिकाणी यावर्षीही हायवेवरून पाणी वाहिलंय. तेही एकदा नाहीतर दोनदोनदा…शुक्रवारी तर याच शिदेवाडी डोंगराला पावसाच्या पाण्यामुळे भगदाडचं पडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. डोंगरावरच्या पाण्याला वाट न मिळाल्याने डोंगरमाथ्यावरचं पाणी हे वाट काढून थेट हायवेवरच धबधब्यासारखं धोधो कोसळत होतं. याचाच अर्थ दोन वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेतून प्रशासनाने कोणताच धडा घेतलेला नाही असंच स्पष्ट होतंय.

आयबीएन लोकमतचे सवाल

शिंदेवाडीत दोन वर्षांपूर्वी ‘संस्कृती’चा बळी जाऊनही प्रशासनानेच काहीच धडा घेतला नाही का ?
शिंदेवाडीतील हायवेवरची अतिक्रमणं कायमस्वरूपी का हटवली नाहीत ?
डोंगरमाथ्यावरचं पाणी काढून देण्यासाठी अद्याप उपाययोजना का नाहीत ?
प्रशासन आणखी एका ‘संस्कृती’चा बळी देऊ पाहतंय का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close