जे.जे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचं कामबंद आंदोलन मागे

January 9, 2010 8:04 AM0 commentsViews: 1

9 जानेवारी जे. जे. हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टर्सनी आपलं कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. सुरक्षा वाढवण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री जे.जे. हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. आणि त्यामुळे संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जे. जे. च्या कर्मचारी आणि डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली होती. पण शनिवारी वैद्यकीय उपसंचालक एन. अंबोदे यांनी सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे संपावरचे निवासी डॉक्टर, जे. जे. हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक यांची एक बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपात एकूण 1200 डॉक्टर्स आणि 700 नर्स सहभागी झाले होते.

close