कालचे चहाविक्रेते आज लाखांच्या सुटाबुटात -राहुल गांधी

September 19, 2015 7:17 PM1 commentViews:

1rahul vs modi _bihar9 सप्टेंबर : नरेंद्र मोदी चहाविक्रेते होते पण आता पंतप्रधान झाल्यावर ते15 लाखांचा सूट घालताय बोचरी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीये. तसंच मोदी सरकार गरिबांचं नाही तर सूटबूटवाल्यांचं आहे, अशी तोफही त्यांनी डागली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधल्या चंपारणमध्ये प्रचारसभा घेतली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

बिहार निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज चंपारणमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत मोदी सरकारचा समाचार घेतला. महात्मा गांधीजींनी गरिबांसाठी सुटाचा त्याग केला आणि मोदींनी चहाविक्रेत्यापासून सुरूवात करून सूटबूट परिधान केलं, असा टोला राहुल गांधींनी लगावला. मोदी एसी रुममध्ये बसून मोठ्या मोठ्या बैठका घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांना रोजगार मिळणार आहे का ?, त्यांनी जनतेशी संवाद साधला पाहिजे. निवडणुकीच्या अगोदर सर्वांच्या अकाऊंटमध्ये 15 लाख जमा होतील असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. पण आता तो पैसे आला का ? असा सवाल उपस्थित केला. तसंच भूसंपादन विधेयकाच्या आड मोदी सरकार शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसची बिहारमधली ही पहिलीच प्रचारसभा होती. बिहारमध्ये काँग्रेसनं संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केलीय. 243 जागांसाठी आघाडीचं जागावाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    Rahulji jara sambhaLun . Ya chaha walyanach tumchi dandi udvali. Kunnava kashi tika karayala havi yacha thoda abhyas karaa.

close