बाबासाहेबांच्या स्मारकाचं 4 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन ?

September 19, 2015 7:43 PM0 commentsViews:

bababsaheb smarak19 सप्टेंबर : मुंबईतील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला स्मारकचं भूमिपूजन होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दादर परिसरातील इंदू मिलच्या 20 एकर जागेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीये. पण भूमिपूजन कधी होणार हा प्रश्न रखडला होता. दलित संघटनांनी यासाठी आंदोलनंही केली होती. आता आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन 4 ऑक्टोबरला होणार आहे. या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे या भूमिपूजनासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार 4 ऑक्टोबर ला पंतप्रधान उपस्थित राहू शकतात असं पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्र्यांना कळवलंय. त्यामुळे याची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close