चोरीच्या आरोपावरुन शेतमजूर दलित दांपत्याला गरम तेलात हात घालण्याची अघोरी शिक्षा

January 9, 2010 8:08 AM0 commentsViews: 2

9 जानेवारी चोरीच्या आरोपावरुन शेतमजूर दलित दांपत्यास गरम तेलात हात घालण्याची शिक्षा देण्याचा अघोरी आणि संतापजनक प्रकार सोलापुरातील मंगळवेढ्यातल्या चामदर्डी गावात घडला आहे. शुक्रवारी दुपारी हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेत ईश्वर आणि लक्ष्मी गायकवाड हे दांपत्य जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावातल्या शेतमालक असलेल्या पुजारी या व्यक्तीसह पाचजणांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.

close