‘सनातन’वर बंदी घालण्यावरून काँग्रेसमध्येच बेबनाव

September 20, 2015 12:47 PM0 commentsViews:

विवेक कुलकर्णी, मुंबई

20  सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला अटक झाली आणि सनातनवर बंदीचा मुद्दा पन्हा एकदा चर्चेत आला.सनातनवर बंदीचा प्रस्ताव आपल्यासमोर आलाच नाही असं म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला खरा पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही हे आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या कागपत्रांवरुन दिसतंय.

safesarwpy

शिंदेज्या राज्य सरकारवर ही जबाबदारी ढकण्याचा प्रयत्न करतांयत त्या सरकारचे मुख्यमंत्री त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांनी मात्र आपण सनातनवर बंदीची मागणी करणारं पत्र केंद्राला लिहिलं होते आणि या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता असा प्रतिदावा चव्हाण यांनी केलाय. एकंदरीतच काय तर एकाच पक्षाचं केंद्रात आणि राज्यात सरकार असूनदेखील दोघांमध्ये बेबनाव होता हे स्पष्ट दिसतं आहे. काँग्रेस नेत्यांच्या एकमेकांचे पाय खेचण्याच्या वृत्तील हे साजेसच आहे म्हणा.

सनातन संस्थेच्या कारवाया आणि त्यासंबंधीच्या घडामोडी यांवर नजर टाकूयात..

सनातन संस्था – एक नजर

– 20 फेब्रुवारी 2008 – पनवेल – सिनेराज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला
– 31 मे 2008 – वाशी – विष्णुदास भावे सभागृहात बॉम्बस्फोट
– 4 जून 2008 – ठाणे – गडकरी रंगायतनाच्या पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट
– 16 ऑक्टोबर 2009 – मडगाव, गोवा – सनातनच्या कार्यकर्त्यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू
– 11 एप्रिल 2011 – राज्य सरकारचा केंद्राकडे्र सनातनवर बंदीचा प्रस्ताव
– 15 डिसेंबर 2011 – सनातनवर बंदीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल
– 10 एप्रिल 2012 – राज्य सरकारनं हायकोर्टात बंदीच्या मागणीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं
– 11 मार्च 2013 – राज्य सरकारच्या प्रस्तावाची अधिक माहिती मागवत असल्याचं केंद्राचं हायकोर्टात प्रतिपादन
– 20 ऑगस्ट 2013 – नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, संशयाची सुई सनातनकडे

बेबनाव झाला त्यावेळी राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं राज्य होतं. आणि आत्ताचा योगायोग असा की आत्ताही राज्यात आणि केंद्रात भाजप या एकाच पक्षाची सत्ता आहे. तेव्हा आधीच्या सरकारपासून काही धडा हे सरकार शिकणार हे पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close