सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांना भेटणार- नरेंद्र मोदी

September 20, 2015 1:47 PM0 commentsViews:

modi man ki baat

19 सप्टेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आज (रविवारी) दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पन्नासहून अधिक नातेवाईक ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान निवासस्थानी येणार असून त्यांच्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक असल्याचे मोदींनी सांगितलं. मात्र, बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज खुला करण्याच्या मागणीवर मोदींनी यावेळी मौन बाळगणे पसंत केलं.

‘मन की बात’च्या वर्षपूर्तीनिमित्त बोलत असताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नेताजींनी जर्मनीत स्वत:चा रेडिओ सुरू केला होता. विज्ञानात मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांनी ही ताकद ओळखावी आणि विज्ञानाप्रती रुची वाढवावी, असं आवाहन मोदींनी केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’ कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, विरोधकांची ही मागणी आयोगाने फेटाळून लावली. या पार्श्वभूमीवर बोलत असताना मोदींनी आयोगाच्या अधिकार्‍यांचे कौतुक करत विरोधकांना अप्रत्यक्षरित्या प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. या कार्यक्रमातून खूप काही शिकायला मिळालं. मन की बातसाठी लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. आतापर्यंत एकूण 55 हजार फोन आल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली. त्यामुळे लोकशाही साम्राज्यात तमन की बाततसारख्या कार्यक्रमावर टीका होण्याऐवजी उलट कौतुक व्हायला हवं, असंही ते पुढे म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close