दुसर्‍या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मंगेश पाडगावकर

January 9, 2010 8:22 AM0 commentsViews: 101

9 जानेवारी दुबईत होणार्‍या दुसर्‍या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचं मंगेश पाडगावकर यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. दुसर्‍या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकर यांना विचारणा करण्यात आली होती. यावर त्यांनी आयबीएन-लोकमतशी फोनवर बोलताना हे निमंत्रण स्वीकारलं असल्याचं सांगितलं. याबाबतची अधिकृत घोषणा शनिवारी होणार आहे. या संमेलनाची तारखांची घोषणाही शनिवारी होणार आहे.

close