‘झेंडा’चा वाद रंगला : राजकीय सेन्सॉरशिपचा निषेध

January 9, 2010 10:07 AM0 commentsViews: 14

9 जानेवारीनितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं 'झेंडा'ला आक्षेपच घेतला नाही तर धमक्याही दिल्या, असा आरोप अवधूत गुप्तेने केला आहे. आयबीएन-लोकमतवरील आजचा सवाल या कार्यक्रमात अवधूतने ही धक्कादायक माहीती दिली. तर नितेश राणेंची अरेरावी आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात पुन्हा दिसली. राणेंची बदनामी करणार्‍यांना धडा शिकवण्याची धमकी त्यांनी दिली. तर झेंडा या सिनेमावर स्वाभिमान संघटनेने घेतलेला आक्षेप योग्यच असल्याचं मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. अवधूत गुप्ते याने दिग्दर्शन केलेल्या 'झेंडा' या सिनेमात मालवणकर नावाचं कॅरेक्टरवर राणे यांनी आक्षेप घेतलाय. स्वाभिमान संघटनेसाठी 'झेंडा'चा खास शो अंधेरी येथे गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. सिनेमा पाहिल्यानंतर त्यातील चार सीन्स वगळण्याची मागणी नितेश राणे यांनी अवधूत गुप्तेकडे केली होती. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन अवधूतने राणेंची मागणी मान्य केल्याचं सांगितलं. मात्र हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा उल्लेखही त्याने केला होता. या वादामुळे झेंडा सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्या उपस्थित करत समाजाच्या विविध स्तरातून त्यावर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसमधूनही आता स्वाभीमान संघटनेच्या राजकीय सेन्सॉरशिपचा निषेध होतोय.राजकीय सेन्सॉरशिपला कलाकारांचा विरोध – श्रीराम लागू कुठलीही कलाकृती आहे तशी मांडण्याचा पूर्ण अधिकार दिग्दर्शकाला आहे. दंगे आणि विरोध करून तुम्ही कोणीही दाबू शकत नाही. राजकीय सेन्सॉरशिपला कलाकारांचा विरोध असेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी व्यक्त केली आहे.राजकीय सेन्सॉरशिपचा अधिकार कोणालाही नाही – मुख्यमंत्री राजकीय सेन्सॉरशिपचा अधिकार कोणालाही नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांनी सरकारक डे कोणतीही तक्रार केली नाही. पण तक्रार केली तर सरकार पुरेशी मदत द्यायला सक्षम असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सगळ्यांना सिनेमा दाखवायची गरज नाही – विलासराव देशमुखअवधूत गुप्ते यांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सिनेमा दाखवण्याची गरज नसल्याचं मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

close