पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलच्या संपर्कात?

September 21, 2015 1:04 PM0 commentsViews:

ÖêËÖêêßÖê

21 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी कोल्हापुरात आलेल्या ‘एनआयए’च्या पथकानं संशयित समीर गायकवाडची आज कसून चौकशी केली. असं असलं तरी अजूनही या तपासातला गुंता दूर झालेला नाहीये. दरम्यान, 2009 मध्ये झालेल्या मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलचं नाव समीर गायकवाडच्या चौकशीतून पुढे आलं आहे. रुद्र पाटील हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता असून 2009 पासून तो फरार आहे.

समीरच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून तो रुद्र पाटीलच्या संपर्कात असल्याचं पुढे आलं आहे. रुद्र आणि समीर यांनी आणखी दोघांसह जानेवारी महिन्यात कॉम्रेड पानसरेंच्या घराभोवतीचा परिसर आणि रस्त्यांची रेकी केल्याची माहितीही समोर येतेय. मात्र या माहितीला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही समीरच्या चौकशीतून या खुनाच्या कटाबाबतच्या अनेक गोष्टी उघड होत असल्याचं पोलीसांच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय.

एनआयएचा तपास आजही सुरू राहणार असून आरोपी समीर गायकवाडच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. आता एनआयए आणि पोलीस रुद्र पाटीलच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर सातत्याने आरोप नाकारणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंबंधी सरकार काय पावले उचलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close