स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजप नेते बाळासाहेबांची भेट घेणार

January 9, 2010 1:41 PM0 commentsViews: 1

9 जानेवारी स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेच्या समर्थनासाठी भाजपाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजप नेत्यांची नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत भापज नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यावी असा निर्णय घेण्यात आला. आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावरुन राज्यात सध्या वाद सुरु आहेत. भाजपाने वेगळ्या विदर्भाला उघड पाठिंबा दर्शवला आहे. तर शिवसनेने महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अशी भूमिका घेत वेगळ्या विदर्भाला विरोध केला आहे.

close