एरिक सिमन्स नवे भारतीय टीमचे बॉलिंग कोच

January 9, 2010 1:46 PM0 commentsViews: 2

9 जानेवारी भारतीय क्रिकेट टीमच्या बॉलिंग कोचपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू एरिक सिमन्स यांची निवड करण्यात आली आहे. याआधीचे भारतीय टीमचे कोच व्यंकटेश प्रसाद यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यानंतर गेले काही महिने हे पद रिकामं होतं. पण गेल्या काही मॅचमध्ये भारतीय टीमच्या बॉलर्सची कामगिरी अतिशय खराब झाली होती. यावरुन टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानंही नाराजी व्यक्त केली होती. टीमला बॉलिंग कोचची गरज असल्याचं मतही त्याने व्यक्त केलं होतं. सिमन्स येत्या 16 जानेवारीपासून आपली नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत.

close