‘शिक्षणाचा आयचा घो’ प्रदर्शित होऊ देणार नाही – मराठा महासंघ

January 11, 2010 10:00 AM0 commentsViews: 7

11 जानेवारी 'शिक्षणाचा आयचा घो' हा सिनेमा सध्याच्या नावासह प्रदर्शित करायला मराठा महासंघाने तीव्र विरोध केला आहे. महेश मांजरेकरांनी 'च'ची भाषा केल्यास त्याचं त्याच भाषेत उत्तर देऊ अशी धमकी मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी पुन्हा दिली आहे. मराठा महासंघाच्या या धमकीनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे. 'शिक्षणाच्या आयचा घो' ला पाठिंबा दिला म्हणून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी सांगितलं आहे. या सिनेमाच्या नावाला आक्षेप घेतलेले मराठा महासंघाचे मुंबईतले पदाधिकारी सोमवारी दुपारी दोन वाजता सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन देणार आहेत.

close