नेपाळमध्ये नव्या राज्यघटनेविरोधी जनक्षोभ, 42 जणांचा बळी

September 21, 2015 6:10 PM0 commentsViews:

nepal3421 सप्टेंबर : नेपाळनं नव्या राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून नेपाळमध्ये जनक्षोभ उसळलाय. जमावाकडून हिंसक निदर्शनं सुरू आहेत. त्यात आतापर्यंत 42 जणांचा बळी गेलाय. नव्या राज्यघटनेमध्ये पहाडी भागातल्या नागरिकांना जास्त अधिकार देण्यात आले आहेत आणि तरई भागातल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, असं या निदर्शकांचं म्हणणं आहे.

नेपाळच्या सखल भागात बिहिरी मैथिली आणि यादव वंशाचे लोक राहतात. हे नागरिक मूळचे भारतातले आहेत. तरई भागातले हे लोक आणि पहाडी भागातल्या नेपाळींमध्ये हा संघर्ष सुरू आहे. राज्यघटनेवरचे मतभेद पाहता घाईघाईत ती स्वीकारू नका असा सल्ला भारतानं दिला होता. पण नेपाळनं त्याला भीक घातली नाही. दुसरीकडे चीननं मात्र नेपाळच्या नव्या राज्यघटनेला मान्यता दिली. यामुळे चीन आणि नेपाळ जवळ येण्याची शक्यता आहे. ही शक्यता मात्र भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close