जमिनीच्या वादातून खून करून मृतदेह जाळला

September 21, 2015 6:45 PM0 commentsViews:

shirur murder321 सप्टेंबर : शिरूर तालुक्यात सविंदने गावात सुरेश सोमा मोटे या शेतकर्‍याचा खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. जमिनीच्या वादातून सुरेश मोटे यांचा खून करण्यात आला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सुरेशी मोटे यांचा त्यांच्या चुलत्याशी जमिनीचा वाद सुरू होता. सुरेश मोटे त्यांच्या मळ्यातील घरात एकटे झोपले असताना सुरेश मोटे यांचा खून करण्यात आला. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. मृत सुरेश मोटेची दोन्ही मुलं पोलीस खात्यात आहेत. त्यांची मुलं नाशिक येथे महाकुंभच्या बंदोबस्तासाठी ड्युटीवरर असताना त्यांचा वडिलांचा अशा प्रकारे निर्घृण खून करण्यात आला. मोटेंच्या चुलत्यांनीच ही हत्या केली असा संशय मोटेंच्या मुलांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close