बीएमसीच्या इंजिनीयर्सचं काम बंद आंदोलन

January 11, 2010 10:27 AM0 commentsViews: 1

11 जानेवारी शिवसेनेचे नगरसेवक संजय अगलदारे यांनी इंजिनीअरला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनीयर्सनी काम बंदआंदोलन सुरू केलं आहे. जी -साऊथ बीएमसी ऑफिस इथे हे आंदोलन करण्यात येत आहे. नगरसेवक संजय अगलदारे यांना अटक होत नाही, तोपर्यंत एकही इंजिनीअर कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका संघटनेनं घेतली आहे. जी -साउथचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामध्ये हॉस्पिटल, पाणी पुरवठा आणि सफाई कामगार सोडून इतर सर्व महानगरपालिका कर्मचारी आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात सोमवारी संध्याकाळी पाच वाजता एक बैठक होणार आहे. इंजिनीअर्सना मारहाण करुन मुंबईच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. तर एकत्रित चर्चा करुनच हा प्रश्न सुटू शकतो असं मंुबईच्या महापौर श्रध्दा जाधव यांनी म्हटलं आहे.

close