सात हजार खलाशांचा आमरण उपोषणाचा इशारा

January 11, 2010 12:21 PM0 commentsViews: 3

11 जानेवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुमारे सात हजार निवृत्त खलाशांनी आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे. भारतीय मर्चन्ट नेव्हीत सेवा बजावून निवृत्त झालेल्या खलाशांना गेली सात वर्षं पेन्शनविना रहावं लागत आहे. 2002 मधे मर्चन्ट नेव्हीत खलाशांच्या प्रॉव्हीडन्ड फंडात 92 कोटी 75 लाखाचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. मात्र तेव्हापासून युनियनने निवृत्त खलाशांना त्यांच्या हक्काचा एक छदामही अद्याप दिलेला नाही. केवळ दोनशे रुपयाच्या सहाय्यता निधीवर हे खलाशी आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. खलाशांना पेन्शन मिळावी म्हणून शिवसेनेच्या लोकाधिकार समितीकडेही या खलाशांनी कामावर आल्यापासून आपलं गार्‍हाणं मांडलं. पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. अशा परिस्थितीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुमारे सात हजार निवृत्त खलाशांनी आता आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे.

close