पालिकेच्या पाणी वाचवा मोहीमेत सचिन

January 11, 2010 1:07 PM0 commentsViews: 18

11 जानेवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता 'पाणी वाचवा' या मुंबई महानगरपालिकेच्या मोहीमेत सहभागी होणार आहे. मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार असल्याने मुंबई महानगरपालिकेने पाणी वाचवा मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेसाठी सचिनने एक अँड फिल्ममध्ये काम केलंय. स्वत:ही आंघोळीसाठी शॉवरचा वापर करणार नसून फक्त एक बादली पाण्यात आंघोळ करण्याचा निर्धार सचिनने केला आहे.

close