साखरे भाव कधी उतरतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही – शरद पवार

January 11, 2010 1:10 PM0 commentsViews: 5

11 जानेवारी साखरेचे भाव कधी उतरतील हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार दिल्लीत बोलत होते. साखरेचे भाव कमी कधी होतील हे मी आताच कसं सांगू शकतो असा सवालही त्यांनी केला. कच्च्या साखरेवर प्रोसेस करण्याची परवानगी उत्तरप्रदेश सरकारने दिली नसल्याने साखरेचे भाव वाढले असं सांगून गरज पडल्यास साखर आयात करावी लागेल असंही ते म्हणाले. साखरेचं उत्पादन कमी झाल्याने साखरेचा भाव पुढील दोन वर्षे तरी कमी होणार नाही, असं गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी म्हटलं होतं.

close