स्वतंत्र विदर्भासाठी जेलभरो आंदोलन सुरु करण्याचा निर्णय

January 11, 2010 1:12 PM0 commentsViews: 7

11 जानेवारी वेगळ्या विदर्भासाठी 28 तारखेच्या अगोदरपासून जेलभरो आंदोलन सुरु करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. मात्र तारखेचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. सोमवारी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ राज्य संकल्प परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सर्व पक्षातून 700 ते 800 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी विदर्भ राज्य समिती स्थापन केली आहे. या परिषदेला विदर्भातले सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मात्र अनुपस्थिती होती. यावेळी कुठलीही पर्वा न करता मी विदर्भाच्या आंदोलनात असल्याचं विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. तर प्रकाश आंबेडकर बैठकीला आले असते तर बरं झालं असतं असं काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे यांनी म्हटलं आहे. तसंच माणिकराव ठाकरेंनी विदर्भ आंदोलनात उतराण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विदर्भाच्या मुद्यावर 18 जानेवारीला काँग्रेसची बैठक होणार असल्याची माहीतीही यावेळी दत्ता मेघे यांनी दिली.

close