भाजप ‘दक्ष’, आरक्षणाचा फेरविचार गरजेचा नाही !

September 21, 2015 11:11 PM1 commentViews:

ravi shankar on bhagvat21 सप्टेंबर : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या “आरक्षण धोरणाचा पुन्हा आढावा घेतला पाहिजे” या सुचनेवर भाजपने हात वर केले आहे. आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचं भूमिका भाजपची आहे, भाजपचा आरक्षणाला कायम पाठिंबा आहे असं केंद्रीय कायदा मंत्री  यांनी स्पष्ट केलं. तर दूसरीकडे अशा प्रकारचं कुठलचं वक्तव्य भागवत यांनी केलं नसल्याचं संघाचे नेते राम माधव यांनी स्पष्ट केलं.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा लहानसं राजकीय वादळ निर्माण झालं. आरक्षण धोरणाचा आढावा घेतला पाहिजे, असं मत सरसंघचालत मोहन भागवत यांनी व्यक्त केल्यामुळे अनेक भुवया उंचावल्या गेल्या. संघाच्या पांचजन्य आणि ऑर्गनायझर या मुखपत्रांना मोहन भागवत यांनी मुलाखत दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण झालं नसतं तर त्याचा चांगला परिणाम झाला असता, मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे याचा विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी. आणि कोणत्या गटांना आरक्षणाची गरज आहे, आणि किती काळ त्याचा विचार व्हावा असं भागवत यांनी या मुलाखतीमध्ये सुचवलं. गुजरातमध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ही सूचना केली.

त्यामुळे साहजिकच भाजपच्या आड संघाची भूमिका समोर येतेय की काय अशी चर्चा सुरू झाली. पण भाजपने वेळीच सारवासारव करून प्रकरणावर पडदा टाकला. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचं भूमिका भाजपची आहे, भाजपचा आरक्षणाला कायम पाठिंबा आहे असं स्पष्ट करून टाकलं.

तर संघानेही प्रतिक्रिया देऊन हात मोकळे केले. “मोहन भागवत यांनी आरक्षणाविरुद्ध कुठलंच विधान केलेलं नाही. सर्व मागासवगीर्ंयाना आऱक्षणाचे फायदे मिळावे एवढचं त्यांनी म्हटल होतं” अशी प्रतिक्रिया राम माधव यांनी दिली.

हिम्मत असेल तर आरक्षण संपवून दाखवावं – प्रकाश आंबेडकर

संघाची ही जूनी भूमिका आहे.हिम्मत असेल तर त्यांनी राजकीय आरक्षण संपवून दाखवावं अस आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी संघाला दिलंय. कदाचित बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उच्चवर्णीयांना खूश करण्यासाठी हे विधान केलं असावं असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. तर संघाचा अजेंडा हाच सत्तारुढ भाजपचा अजेंडा आहे, हेच भागवत यांच्या भूमिकेवरुन अधोरेखीत होतय असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Parikshit

    please finish all reservations and all educational college (1st std to MBA,ENGG,Pharmacy ,Medical ) will be occupied by “Government of Bharat” and providing free of cost education each and every indian people… modify The Constitution (Eighty-sixth Amendment) Act, 2002. …..rise left policy

close