‘शिक्षणाच्या आयचा घो’चं नाव बदलण्यासाठी मराठा महासंघाचं सेन्सॉरबोर्डाला निवेदन

January 11, 2010 1:18 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी'शिक्षणाच्या आयचा घो' हे नाव बदलावं यासाठी मराठा महासंघाने सोमवारी सेन्सॉर बोर्डीला एक निवेदन दिलं. मुंबईतल्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आपलं निवेदन सादर केलं. 'आयचा घो' या शब्दांनिशी हा सिनेमा प्रदर्शित हाऊ देणार नाही अशी भूमिका मराठा महासंघाने घेतली आहे. त्यानुसार सोमवारी मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे आणि राज्याचे सरचिटणीस दिलीप जगताप यांच्यासह महासंघाच्या इतर नेत्यांनी सेन्सॉर बोर्डाची भेट घेतली. अशा प्रकारे शिव्या असलेलं नाव देणं हा उपमर्द आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याचे आदेश महेश मांजरेकर यांना द्यावेत असं महासंघाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

close