कोण होणार बीसीसीआय अध्यक्ष?

September 22, 2015 9:38 AM0 commentsViews:

BCCI MET

22 सप्टेंबर : जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी कोण बसणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कार्यकाळ संपण्यापूर्वीच दालमिया यांचं निधन झाल्याने बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार असून त्यामध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दालमिया यांची प्रकृती चिंताजनक होती, ठाकूर हेच सारं काम पाहत होते. आता हे पद रिक्त झाल्यावर बीसीसीआयचे आजी-माजी पदाधिकारी यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये पवार यांच्यासह राजीव शुक्ला आणि अनिरुद्ध चौधरी यांची नाव आघाडीवर आहेत. शुक्ला यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. पण मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत कोषाध्यक्षपदासाठी ते रिंगणात असताना चौधरी यांनी त्यांचा पराभव केला होता. चौधरी हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मर्जीतले असून या संघटनेवर आपला अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यापुढे चौधरी यांचा पर्याय असेल.

बीसीसीआय अध्यक्षपद : आता पुढे काय ?

– अध्यक्षपद अचानक रिक्त झाल्यास 15 दिवसांमध्ये एजीएम बोलावण्याचा सचिवांना अधिकार
– एजीएम बोलावली नाही तर बीसीसीआयची सूत्रं सचिव अनुराग ठाकूर यांच्याकडे
– 2017पर्यंत बीसीसीआयचं अध्यक्षपद पूर्व विभागाकडं आहे
– बोर्डाचा नवा अध्यक्ष पूर्व विभागातूनच निवडला जाणार
– पूर्व विभागावर एन. श्रीनिवासन यांचं वर्चस्व, पण निवडणूक लढवायला मनाई
– सध्या शरद पवार, राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर यांची नावं आघाडीवर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close