आमिर खानच्या ‘दंगल’चं पहिलं वहिलं पोस्टर रिलीज

September 22, 2015 10:47 AM0 commentsViews:

22 सप्टेंबर : आमिर खानच्या बहुप्रतीक्षित ‘दंगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलं आहे. कुस्तीचा विषय असलेल्या या चित्रपटात लालमातीत मेहनत करणारा आमिर नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. ‘आज से दंगल शुरू’ असं वाक्य या पहिल्या पोस्टरवर झळकलं आहे.

कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असेल. महावीर यांनी आपली मुलगी गीता फोगट आणि बबिता कुमारी यांना ऑलंपिक खेळासाठी प्रशिक्षण दिलं होतं. आमिर खान या चित्रपटाचा सहनिर्माता आहे तर याचं संगीत प्रितम करणार आहेत. फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांना या कुस्तीपटू मुलींची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. आमिर खानच्या पत्नीची भूमिका साक्षी तंवर करणार आहे.

dangal

दरम्यान, आमिर या सिेनमात रेसलरची भूमिका निभावणार असल्या कारणाने त्याने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आहे. त्याचं म्हणणं आहे की आता जितकं वजन त्याने वाढवलंय तितकंच तो कमीसुद्धा करणारे.

‘दंगल’ चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून सिध्दार्थ रॉय कपूर निर्माता आहेत. 2016 च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close