‘शिक्षणाच्या आयचा घो’चा वाद सुरूच

January 11, 2010 1:58 PM0 commentsViews: 57

11 जानेवारी 'शिक्षणाच्या आयचा घो' या सिनेमावरुन सोमवारीही वाद सुरुच राहिला. सिनेमाचं नाव बदलावं या मागणीसाठी मराठा महासंघाने सेन्सॉर बोर्डाला एक निवेदन दिलं. 'आयचा घो' या शब्दांनिशी हा सिनेमा प्रदर्शित होऊदेणार नाही अशी भूमिका मराठा महासंघाने घेतली आहे. तर महेश मांजरेकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन ह्या सिनेमाला सरकारकडून संरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यानी सिनेमाला सरकरकडून संरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

close