संकेश्वरमध्ये शिजला पानसरेंच्या हत्येचा कट?

September 22, 2015 1:42 PM0 commentsViews:

aerecopy
22 सप्टेंबर : ज्येष्ठ कॉ.गोविंद पानसरे खून प्रकरणी सनातन संस्थेचे आणखी दोघे संशयित तपास यंत्रणांच्या रडावर असून त्यांच्यापैकी रुद्रगोंडा पाटील हा प्रमुख संशयीत असल्याचं एसआयटीने काल (सोमवारी) स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पानसरेच्या खूनाचा कट बेळगाव जिल्ह्यातल्या संकेश्वर आणि खानापूरमध्ये सनातन संस्थेच्या गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीत आखण्यात आला असल्याचीही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. काटाच्यावेळी समीर गायकवाड, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर आणि इतर दोन महिलांही उपस्थित होत्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपी समीर गायकवाडच्या चौकशीतून 2009च्या गोव्यमध्ये झालेल्या मडगाव बॉन्ब स्फोटातला मुख्य फरार आरोपी रुद्रगोंडा पाटील याने समीर गायकवाड, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर आणि इतर दोन महिलांच्या मदतीने पानसरेंच्या खुनाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांच्या गोपनीय सूत्रांनी व्यक्त केलीय. त्यामुळे पोलीस आता रुद्रगोंडा आणि त्याच्या फरार आरोपींच्या शोधात असून समीरची मैत्रिण ज्योती कांबळे हीला ही आज अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, समीरचे संकेश्वर कनेकश्न लक्षात घेचा डॉ. एम.एम. कलबर्गी हत्येत सनातनचा सहभाग होता का? याचा तपास कर्नाटक पोलीस करत आहे. त्यासाठी कर्नाटक पोलीस काल कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे. समीर गायकवाडची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने ती वाढवून घेण्याइतपत आपल्याकडे नवे पुरावे आले आहेत, असा दावा पोलीसांच्या विश्वसनीय सूत्रांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close