कॅबिनेटच्या बैठकीत वाढत्या महागाईवरुन पवारांवर टीका

January 13, 2010 7:35 AM0 commentsViews: 4

13 जानेवारीसाखरेच्या आणि झालेल्या एकूणच भाववाढीसंदर्भात सगळीकडून शरद पवारांना टार्गेट केलं जातंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाववाढीवर मंत्रीमंडळाची जी बैठक झाली त्या पवारांना टार्गेट करण्यात आलं. भाववाढीच्या मुद्यावर ममता बॅनजीर्ंनी पवारांवर टीका केली आहे. पवारांनी भाववाढ आटोक्यात आणण्यासाठी काहीच केलं नाही अशी कठोर टीकाही बॅनजीर्ंनी केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पवारांना जाब विचारला. भाववाढ आटोक्यात यावी म्हणून काय करणार आहात अशी विचारणा त्यांनी पवारांना केली. तर वाढत्या महागाईला शरद पवारच जबाबदार आहेत असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. महागाई कमी कधी होणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही असं व्यक्तव्य सोमवारी शरद पवांर यांनी केलं होतं. त्यावर मुंडेनी पवारांवर टीका केली आहे. पवार महागाईला जबाबदार असल्याने आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत, असंही मुंडे यांनी म्हटलंय.

close