अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचं प्रचंड नुकसान

January 13, 2010 10:41 AM0 commentsViews: 1

13 जानेवारी मराठवाड्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नोव्हेंबर 2009 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसलेला होता. आता रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा तडखा बसल्याने शेतकरी हैराण झालेत. मराठवाड्यात सरासरी 83.26 मि.मी. अवकाळी पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने ज्वारी आणि गव्हाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. ऐन हिवाळ्यात ज्वारीचे पिकं जोमात असताना अवेळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसानं झालं. उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कोरडवाहु जमिनीत हजारो हेक्टरवर ज्वारी पिकाची पेरणी केली जाते. मात्र या वादळी पावसाने आणि गारपीटीने ज्वारीच्या पिकाला जास्त फटका बसला आहे.

close